दिवस १ - पार्श्वभूमी

"नागालँड मध्ये लोक कुत्रा खातात"..लहानपणी झालेली नागालँडची पहिली ओळख. हळूहळू बाकी गोष्टी वाचनात येत होत्या, लोकांकडून ऐकायला मिळत होत्या. 2014 ते 2016 दरम्यान आसाम, अरुणाचल, मेघालय असा प्रवास घडला पण नागालँड मध्ये जायची संधी मिळाली नव्हती.


ज्ञान प्रबोधिनीच्या छोटे सायंटिस्ट प्रकल्पाचा देशभर विस्तार करायची कल्पना पुढे आली आणि मग त्यातच वनवासी कल्याण आश्रमाकडून नागालँड मधल्या शाळेत सत्र घ्यायची मागणी आली. सुरुवातीला नक्की कोण जाणार हे ठरत नव्हते. मग स्वप्नीलचे नाव पुढे आले आणि नंतर कधीतरी माझी वर्णी त्याचा सहकारी म्हणून लागली. ह्याला साधारण महिना झाला असेल. सगळे नियोजन पूर्वा करणार, इथले आयोजन स्वप्नील करणार त्यामुळे मी जाऊन फक्त मुलांबरोबर विज्ञान प्रयोग करत मजा करायची हे फारच आनंददायी होते.

मधल्या काळात अन्य प्रकल्प आणि कामे यात व्यग्र असल्याने फारसा विचार झाला नव्हता. पण दोन गोष्टी कळल्या आणि नव्याने उत्साह आला. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला टेनिंग नावाच्या गावातल्या शाळेत मुख्यतः जायचे होते पण ह्या गावाला जायचा रस्ता गुगल दाखवत नव्हते. दुसरे म्हणजे ह्या शाळेचे उदघाटन 1986-87 मध्ये मा. गिरीशरावांच्या उपस्थितीमध्ये झालेले होते. दिमापूर ह्या शहराच्या गावापासून टेनिंगला यायच्या रस्त्यात जाळूकी नावाचे गाव लागते. 1985-86 मध्ये कै. भय्याजी काणे यांच्या आग्रहावरून प्रबोधिनीने इथे शाळा सुरू केलेली होती आणि मा. अजितराव कानिटकर हे त्या शाळेत काम करत होते (दुर्दैवाने 2-3 वर्षात विद्यार्थ्यांच्या अभावी ही शाळा बंद करावी लागली).
1987 च्या माणूस मासिकाच्या दिवाळी अंकातील अजितरावांचा प्रदीर्घ लेख पण वाचायला मिळाला आणि नागालँड बद्दलचे ज्ञान बरेच वाढले. 
मार्च महिन्यातच इथे जनजाती विकास समिती नागालँड (वनवासी कल्याण आश्रमाची शाखा) यांच्या वतीने चालणाऱ्या संस्कार वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाला प्रकाश सर आणि प्रणव कुलकर्णी येऊन गेले होते. आणि त्यापूर्वी अखिल भारतीय सह संघटन मंत्री असलेले संदीपजी कवीश्वर प्रबोधिनी भेटीला येऊन गेलेले होते. त्यामुळे एक आपलेपणा आपोआप तयार झालेला होता.
साहित्याची जुळणी, सत्रांचे नियोजन, वैयक्तिक तयारी असे सगळे होऊन 17 एप्रिलला रात्री 11:30 ला प्रबोधिनीतून मुंबईकडे प्रयाण केले.
(मधल्या काळात आमच्या जोडी मध्ये साकार दिवेकर ह्या नुकत्याच 10वी ची परीक्षा दिलेल्या युवकाची भर पडली होती, त्यामुळे वय वर्षे 40, 24 आणि 15 अश्या तिघांचा गट जमला) 
अमर परांजपे@ 17 एप्रिल 2022

Comments

  1. मस्त अनुभव आणि लेखन पण....

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान !पूढील भागाची उत्सुकता आहे.शब्दांकन खूप छान.

      Delete
  2. Eagerly waiting for next episode.

    ReplyDelete
  3. छान. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत!👍

    ReplyDelete
  4. खुप छान, आम्हाला प्रत्यक्ष नागालँड ला असल्याचा अनुभव येतोय..... 🙏

    ReplyDelete
  5. सुरवात फार छान झाली आहे, नागालॅंड मधील अनुभव वाचण्याची उत्सुकता आहे.

    ReplyDelete
  6. स्वाती कुलकर्णी इचलकरंजीApril 28, 2022 at 3:56 AM

    उत्सुकता वाढवली आहेस ..छान शब्दांकन..

    ReplyDelete
  7. खूप छान लेखन आणि अनुभव 👌

    ReplyDelete
  8. मस्त अनुभव! पुढील भागाच्या प्रतीक्षेत 👌

    ReplyDelete
  9. छान! अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर सुरुवात...पुढील अनुभव वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.

    ReplyDelete
  11. प्रांजली कुलकर्णी सांगलीApril 28, 2022 at 5:11 AM

    सर्व भाग वाचायला आवडतील.

    ReplyDelete
  12. Purva Deshmukh
    Mastch Amar dada....bharich

    ReplyDelete
  13. छान पुढील लेखाची वाट पहात आहे

    ReplyDelete
  14. मधुरा गोखलेApril 28, 2022 at 7:40 AM

    लेख आवडला. पुढचे लेख वाचायला आवडेल. ्

    ReplyDelete
  15. खूप छान लिहिले आहेस...👌👌👍

    ReplyDelete
  16. Awaiting for your next interesting blog

    ReplyDelete
  17. लेख वाचून तुम्ही बोलले वाक्य आठवलं
    "पाहिले सुरवात तर करा"

    पुढील लेख वाचायला आवडेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिवस 3 - दिमापूर... आणि टेनिंग प्रवास

दिवस 5 – प्रयोगातली मजा, आणि सत्संगाचे प्रयोजन