Posts

दिवस 12 – समारोप

Image
पहाटे जाग आली तीच मुळी गुवाहाटी स्टेशन वरच्या announcement मुळे. गेल्या 8 दिवसात टेनिंग मुक्कामात अश्या गदारोळाची – आवाजाची सवयच गेली आहे याची जाणीव झाली. रस्ता शोधत शोधत चालण्याच्या अंतरावर असलेल्या   वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात पोचलो. काल संध्याकाळीच दिमापूर मधून तसे कळवलेले होते. पण इथे पोचलो तर बाहेरच्या फाटकला कुलूप आणि फोनला सुद्धा काही प्रतिसाद नाही. बहुदा आम्ही नेमके किती वाजता पोचणार ह्याची कल्पना तिथे मिळाली नव्हती. सुदैवाने शेजारीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय पण आहे आणि तिथले एक जण जागे होते. त्यांनी आम्हाला आत घेतले आणि आतल्या बाजूने कल्याण आश्रमाच्या कार्यालयात पोचवले. आता 2 तास तरी परत झोपायला हरकत नाही असे म्हणून आडवे होणार इतक्यात स्वप्नीलच्या लक्षात आले की त्याचा स्वेटर रेल्वेमध्येच विसरला आहे. रेल्वेचा शेवटचा थांबा गुवाहाटीच असल्याने स्वेटर मिळायची शक्यता होती. त्यामुळे स्वप्नील परत स्टेशनकडे रवाना झाला. जवळ जवळ 2 तासांनीच तो परत आला तो स्वेटर घेऊनच. पार अगदी यार्ड मध्ये जाऊन वगैरे त्याने काय काय केले ही कथा त्याच्या तोंडूनच ऐकण्यासारखी आहे. इकड

दिवस 11– परतीचा प्रवास

Image
काल रात्रीचा पाऊस पहाटे पहाटे थांबला आणि नेहमीप्रमाणे लक्ख दिवस उजाडला. पहाटे 6 वाजता निघायचे असे नियोजन होते त्यामुळे 5 पूर्वीच सगळे आवरून प्रातः स्मरणाला गेलो. आम्ही मुक्कामाला वापरत असलेली खोली पण नीट आवरून घेतली. कितीही नाही म्हंटले तरी गेले आठ दिवस हे आमचे घरच होते ना !   तत्पूर्वीच इथल्या तत्पर संयोजकांनी आम्हाला चहा पण दिला. प्रार्थनेनंतर स्वप्नीलने मुलांशी संवाद साधला , त्यांना चॉकोलेट दिली आणि निरोप घेतला. अर्थात सगळ्यांबरोबर एक ग्रुप फोटो काढला हे आता सांगायला नकोच. पावणे सहा वाजताच निवासातून निघालो , गाडी जिकडून सुटते तिकडे जायला. गाडी पण वेळेत आली. सगळे सामान वरती ठेवले त्यामुळे सुटसुटीत बसायला जागा मिळाली. सुरुवातीला गाडीत चालक आम्ही तिघे आणि एक मुलगा एवढेच होतो. 1-2 ठिकाणी आम्ही चालत्या गाडीतून च फोटो काढतो आहे हे पाहून त्याने गाडी थांबवली सुद्धा.   झीरो पॉईंट , चांगराम , न्यू टेसेन असे गावागावात प्रवासी वाढत गेले. चालका शेजारी मी आणि स्वप्नील आणि मागच्या खिडकी मध्ये साकार अश्या खास जागा आम्हाला मिळालेल्या असल्याने रस्ता आणि आजूबाजूचे सहज दिसत होते.  अर्थात रस्ता बघणे

दिवस १० - भरभर संपलेला भरगच्च दिवस

Image
रात्री राजुजींच्या घरून जेवण करून येईपर्यंत बराच उशीर झाला होता आणि लेखन राहून गेले होते. उद्या प्रवासात बरच वेळ मिळेल तेव्हा लिहू अश्या सबबीखाली झोपून टाकले. आत्ता पहाटेचे 2 वाजलेत, अचानक जाग आली ते ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या आवाजाने. बाहेर येऊन पाहिले तर वेगळाच नजारा. ईशान्य भारतातील पाऊस पहायचा राहिला होता..चला ब्राह्म मुहूर्तावर तोही पहायला मिळाला तर..मला कशी जाग आली कोण जाणे आणि हा निसर्गाविष्कार बघायला मिळाला..  रात्री हे रूप भीषण वाटत होतं..दिवसा पाऊस सौम्य वाटतो..अगदी कडाडत पडला तरी, धुंवाधार बरसला तरीही.. रात्री मात्र हा पाऊस रौद्र वाटतोय. परत खोलीत आलो पण झोप येईना. निद्रेमधूनि जागा होता नवाच मी मजला दिसतो । उलगडणारी दुनिया भवती मी मध्ये माझा नसतो । या पद्याच्या ओळी आठवल्या . गूढ, वेगळाच  अर्थ जाणवला त्यावेळी काय होत होतं कोण जाणे.. म्हणून मग लिहायला घेतले. बहुदा लेखन पूर्ण केल्याशिवाय इथून जाऊ नये अशी देवाची इच्छा दिसते आहे. चला  हा शेवटचा दिवस टेनिंग मुक्कामातला. बाकी सकाळ नेहमीप्रमाणे - प्रातः स्मरण, उपासना. उपासना झाल्यावर चहा पिणे, बरोबर टोस्ट. स

दिवस 9 - विज्ञान प्रयोग आणि प्रयोग विज्ञान

Image
आज आमच्या इथल्या कामाचा शेवटून दुसरा दिवस. हराक्का शाळेतील 8वी आणि 9वी च्या गटासाठी छोटे सायंटिस्टची 6 सत्र घेणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट. मधला एक दिवस नियोजनाप्रमाणे न झाल्यामुळे आज तसे चौथेच सत्र होणार होते.  आजचा विषय sound and light असा होता. यातली theory पक्की माहिती होती पण प्रत्यक्ष हे प्रयोग कधी करून घेतलेले नव्हते त्यामुळे थोडे टेन्शन होतेच.  पहाटे 4 वाजताच नेहमीप्रमाणे जाग आली. सूर्योदय व्हायचा होता पण फटाफटायला लागलेले होते. वातावरण प्रसन्न होते. 10-15 मिनिटे शांत बसलो बाहेर येऊन. साडेचार नंतर आवरणे सुरू केले. प्रातः स्मरण , उपासना, चहा पान  रोजच्या प्रमाणे झालेच. नंतर मात्र थोडा वेळ आजच्या प्रयोगाचा अभ्यास (वाचन आणि व्हिडिओ बघणे इत्यादी) केला. प्रवचनापूर्वी स्वाध्याय करायलाच पाहिजे ना!! मागे पण एका लेखात उल्लेख केला..सहज आठवलं म्हणून परत सांगतो प्रशांत दिवेकर लिखित  स्वाध्याय प्रवचने च। पुस्तक जरूर वाचा.  सकाळचे जेवण  नेहमीप्रमाणे साडे आठ वाजता करून आम्ही शाळेत हजर झाले. आमचे अती थोडे भात खाणे बघून असेल किंवा अन्य काही पण आता आम्हाला सकाळच्या जेवणात उकडलेले अंडे मिळायला लागल

दिवस 8 - भ्रमंती, भटकंती

Image
  आज रविवार असल्याने नेहमीचे वेळापत्रक नव्हते , कुठले सत्र पण घ्यायचे नव्हते. शिबिरादरम्यान अशी सुट्टी म्हणजे आम्ही पटकन आवरून बाहेर पडलोच म्हणून समजा. इकडे येण्यापूर्वी अजितरावांना भेटलो तेव्हा त्यांनी इंजाव या गावाला भेट द्या असा सल्ला दिला होता आणि त्यांचे 86-87 सालातले काही संपर्क पण दिलेले होते. ह्या शाळेतल्या उपमुख्याध्यापिक तलामसी मॅडम माहेरच्या त्याच गावातल्या आहेत हे समजले होते आणि रविवारी तिकडे जाता येईल का अशी चर्चा पण झाली होती , हे कालच्या भागात तुम्ही वाचलेच. अर्थात अजितरावांचा आग्रह होता की आम्ही चालत जाऊन यावे (त्यांनी स्वतः तसे 2-3 वेळा केलेले असल्याने , आम्ही तसा अनुभव घ्यावा हे वाटणे स्वाभाविक आहे..तेव्हा त्यांनी जाणे , तो प्रवास खूपच कष्टाचा आणि थ्रिलिंग असणार हे नक्कीच)   सकाळचे जेवण झाले की 9 वाजता निघुया हे ठरलेलं होतं (अर्थात गाडीतूनच). सकाळी उठलो तेव्हा सुदैवाने हवा स्वच्छ होती , थोड्याच वेळात ऊन पण पडले. सकाळचे सगळे आवरून आम्ही 9 वाजता तयार झालो तेवढ्यात निरोप आला की 10:30 पर्यंत निघायचे आहे.   स्वप्नीलला काही दम धरवेना , तो 1 5 मिनिटे आधीच तिकडे ज