दिवस 12 – समारोप
पहाटे जाग आली तीच मुळी गुवाहाटी स्टेशन वरच्या announcement मुळे. गेल्या 8 दिवसात टेनिंग मुक्कामात अश्या गदारोळाची – आवाजाची सवयच गेली आहे याची जाणीव झाली. रस्ता शोधत शोधत चालण्याच्या अंतरावर असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यालयात पोचलो. काल संध्याकाळीच दिमापूर मधून तसे कळवलेले होते. पण इथे पोचलो तर बाहेरच्या फाटकला कुलूप आणि फोनला सुद्धा काही प्रतिसाद नाही. बहुदा आम्ही नेमके किती वाजता पोचणार ह्याची कल्पना तिथे मिळाली नव्हती. सुदैवाने शेजारीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय पण आहे आणि तिथले एक जण जागे होते. त्यांनी आम्हाला आत घेतले आणि आतल्या बाजूने कल्याण आश्रमाच्या कार्यालयात पोचवले. आता 2 तास तरी परत झोपायला हरकत नाही असे म्हणून आडवे होणार इतक्यात स्वप्नीलच्या लक्षात आले की त्याचा स्वेटर रेल्वेमध्येच विसरला आहे. रेल्वेचा शेवटचा थांबा गुवाहाटीच असल्याने स्वेटर मिळायची शक्यता होती. त्यामुळे स्वप्नील परत स्टेशनकडे रवाना झाला. जवळ जवळ 2 तासांनीच तो परत आला तो स्वेटर घेऊनच. पार अगदी यार्ड मध्ये जाऊन वगैरे त्याने काय काय केले ही कथा त्याच्या तोंडूनच ऐकण्यासारखी आहे. इकड